शेडगावमध्ये शेंडे गटाला मिळाली सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:27 IST2021-02-05T06:27:30+5:302021-02-05T06:27:30+5:30

श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव परिसरात गेल्या पाच वर्षांत सरपंच विजय शेंडे यांनी दहा हजार झाडे लावली. या झाडांची छाया ...

In Shedgaon, the Shende group came to power | शेडगावमध्ये शेंडे गटाला मिळाली सत्ता

शेडगावमध्ये शेंडे गटाला मिळाली सत्ता

श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव परिसरात गेल्या पाच वर्षांत सरपंच विजय शेंडे यांनी दहा हजार झाडे लावली. या झाडांची छाया ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतपेटीत उमटली. यामुळे शेंडे गटाने अकरापैकी आठ जागा जिंकून वामनराव भदे, लक्ष्मण रसाळ व झुंबरराव झांभळे यांच्या गटाचा पराभव केला.

बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांचे खंदे समर्थक विजय शेंडे यांना पाच वर्षांपूर्वी काम करण्याची संधी मिळाली. विजय शेंडे यांनी विकासाकडे लक्ष केंद्रीत करताना शेडगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. पाच वर्षांत ही झाडे मोठी झाली. गाव बदलले, गावातील सर्व पक्षातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी विजय शेंडे यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी फिल्डिंग लावली. मात्र, मतदारांनी शेंडे यांच्या बाजूने कौल दिला. त्यांचे आठ उमेदवार निवडून आले. वामन भदे, लक्ष्मण रसाळ व झुंबरराव झांभळे यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या.

Web Title: In Shedgaon, the Shende group came to power