शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पवार, ठाकरेंचे राजकारण महाराष्ट्राने गाडले, इंडिया आघाडीचे तीनतेरा वाजणे सुरू; अमित शाहांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 06:36 IST

Amit Shah : अमित शाह यांचा ‘विश्वासघाताच्या राजकारणा’वर शिर्डीच्या भाजप अधिवेशनात घणाघात

शिर्डी : शरद पवार यांनी १९७८ मध्ये सुरू केलेले आणि उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये केलेले विश्वासघाताचे राजकारण महाराष्ट्रातील मतदारांनी जमिनीखाली २० फूट गाडून टाकले. विधानसभा निवडणूक निकालांनी राज्यातील अस्थिर राजकारणालाही मूठमाती दिली आणि भाजप-महायुतीला प्रचंड बहुमत देऊन विरोधकांची सत्तेत येण्याची स्वप्ने धुळीस मिळवली, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी येथे केला.

रविवारी भाजपच्या एक दिवसाच्या अधिवेशनाचा समारोप अमित शाह यांच्या भाषणाने झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सचिव पंकजा मुंडे, शिवप्रकाश, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, संमेलनाचे आयोजक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण यांच्यासह मंत्री, ज्येष्ठ नेते या वेळी उपस्थित होते.

शरद पवार यांच्यामागे महाराष्ट्राचा एक नकाशा आहे आणि पत्रकारांना ते विजयाचे गणित समजावत असल्याचा एक फोटो मी पाहिला होता. आता मी पवारांना समजावतो असे सांगत शाह यांनी राज्याच्या विविध भागांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाची आकडेवारीच दिली. 

विजयासाठी पूर्ण ताकद लावा...स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावा, विरोधकांना एकही जागा मिळता कामा नये. ‘पंचायत से पार्लमेंट तक’ भाजपलाच जिंकवायचे आहे याचा निर्धार करा, असे ते म्हणाले. शरद पवार सहकार क्षेत्रातील बडे नेते, केंद्रात मंत्रीही होते. पण ते शेतकरी आत्महत्या थांबवू शकले नाहीत. जे दावे करत होते त्यांचा सफाया झाला, असेही शाह म्हणाले.

काँग्रेस, भाजपमधील फरक कामातून कळावा : नितीन गडकरीभाजपने विधानसभा निवडणुकीत यशाचे सुवर्ण शिखर गाठले. मात्र, विजयाचे रूपांतर सुराज्यामध्ये करण्याची आता जबाबदारी आहे. काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपचे आले, यातील फरक जनतेला सांगता आला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. केवळ निवडणुकीतील यशाने मोठेपण येत नाही, असे ते म्हणाले.

अमित शाह मैदानात उतरले अन् विधानसभेत चांगले यश मिळालेविधानसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले. आमचे नेते अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाने आलेली आमच्यातील निराशा घालविली, ते स्वत: मैदानात उतरले, आमच्यासोबत लढाई लढले, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाshirdiशिर्डी