शरद पवार विचार मंचकडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:11+5:302021-05-23T04:21:11+5:30
अहमदनगर : शरद पवार विचार मंचच्या वतीने कोरोना रुग्णांना आधार देत नि:स्वार्थपणे आरोग्यसेवा पुरविणाऱ्या सॅलवेशन आर्मी संचलित बुथ हॉस्पिटलला ...

शरद पवार विचार मंचकडून
अहमदनगर : शरद पवार विचार मंचच्या वतीने कोरोना रुग्णांना आधार देत नि:स्वार्थपणे आरोग्यसेवा पुरविणाऱ्या सॅलवेशन आर्मी संचलित बुथ हॉस्पिटलला अंड्याचे ट्रे व पाणी बॉटलच्या बॉक्सची मदत देण्यात आली. शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे ही मदत सुपुर्द केली. यावेळी भैया बॉक्सर, नदीम सय्यद, अर्जुन बडेकर, आयान सय्यद, मुजीर सय्यद, शकील सय्यद, मोहन कड, नाजीम कुरेशी, कमरुद्दीन शेख आदी उपस्थित होते.
सय्यद म्हणाले, देशासह राज्यात कोरोना महामारीचे संकट आले असता रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्वप्रथम सॅलवेशन आर्मी संचलित बूथ हॉस्पिटल पुढे आले. या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दुसऱ्या लाटेत देखील बूथ हॉस्पिटल कोरोनाच्या लढ्यात पाय घट्ट रोऊन अनेकांचे जीव वाचवत आहे. रुग्णांना दररोज विविध खाद्य वस्तू व पाणीची गरज भासत असताना त्यांना ही मदत पुरविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फोटो = साजिद मेल