गुढीपाडव्यानिमित्त लाखो भाविकांनी घेतले शनीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:37 IST2019-04-06T12:36:57+5:302019-04-06T12:37:19+5:30

गुढीपाडव्यानिमित्त लाखो भाविकांनी शनीदेवाचे दर्शन घेतले.

Shani's vision was taken by millions of devotees for Gudi Padwa | गुढीपाडव्यानिमित्त लाखो भाविकांनी घेतले शनीचे दर्शन

गुढीपाडव्यानिमित्त लाखो भाविकांनी घेतले शनीचे दर्शन

सोनई : गुढीपाडव्यानिमित्त लाखो भाविकांनी शनीदेवाचे दर्शन घेतले. श्री. क्षेत्र काशी आणि प्रवरासंगम येथून कावडीने आणलेल्या गंगाजलाचे टाळमृदुंगाच्या गजरात ग्रामस्थांनी स्वागत केले. तरूणांनी कावडीने आणलेल्या गंगाजलाच्या पाणी शनिदेवास घालण्यात आले.
स्थानिक ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थांची संख्या मोठी होतो. कावड मिरवणुकित देवस्थानचे विश्वस्त,अधिकारी, लहान मुलं,महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गंगा स्नानानंतर आज शनिवारी दुपारी बारा वाजता महंत सरस्वती त्रिंबक महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सकाळ पासुन नववर्षानिमीत्त भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. देवस्थानचे कर्मचारी व शिंगणापुर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक नितीन बेंद्रे यांच्यासह पोलीस तैनात आहेत.

 

Web Title: Shani's vision was taken by millions of devotees for Gudi Padwa