शकुंतला टिळेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:50+5:302021-03-07T04:18:50+5:30
-------- दिलीप गोपीनाथ आरणे श्रीरामपूर : तालुक्यातील खंडाळा येथील अचानक नगर येथे राहणारे दिलीप गोपीनाथ आरणे(४९) यांचे अल्पशा ...

शकुंतला टिळेकर
--------
दिलीप गोपीनाथ आरणे
श्रीरामपूर : तालुक्यातील खंडाळा येथील अचानक नगर येथे राहणारे दिलीप गोपीनाथ आरणे(४९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. टिळकनगर कंपनीतील कर्मचारी विलास व कैलास आरणे यांचे ते बंधू होत.
फोटो नाही
--------
श्रीरामपूर : तालुक्यातील भेर्डापूर येथील विमल दगडू बडाख(५७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी,सून व नातवंडे असा परिवार आहे. विमल बडाख या भेर्डापूर सेवा सोसायटीच्या उपाध्यक्ष आणि त्रिमूर्ती महिला बचत गटाच्या अध्यक्षा होत्या. अशोक साखर कारखान्यातील शेतकी विभागातील अधिकारी दगडू बडाख यांच्या त्या पत्नी तर महेश बडाख यांच्या मातोश्री होत.
फोटो आहे.
--------
श्रीकृष्ण कारभारी पाऊलबुध्दे
श्रीरामपूर : तालुक्यातील उंदिरगाव येथील श्रीकृष्ण कारभारी पाऊलबुद्धे(७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, दोन पुतणे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाऊलबुद्धे यांचे ते बंधू होत.
फोटो आहे
--------
राहीबाई पुंजाजी गडाख
श्रीरामपूर : तालुक्यातील लाडगाव येथील राहीबाई पुंजाजी गडाख(९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. स्व.राहीबाई गडाख या प्रगतिशील शेतकरी काशिनाथ, विश्वनाथ व गोरक्षनाथ बडाख यांच्या मातोश्री तर अशोक कारखान्याचे माजी संचालक सारंगधर बडाख यांच्या त्या सासू होत.
(फोटो आहे)
.........................
बळीराम काळंगे
श्रीरामपूर : जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते बळीराम भिकाजी काळंगे यांचे दीर्घ आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले आहे. एनसीसी ऑफिसर महेंद्र काळंगे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे, सुना,पत्नी असा परिवार आहे.
फोटो आहे
.......................
श्रावणी निमसे
राहुरी : राहुरी शहरातील श्रावणी सुनील निमसे (१३) हिचे अल्पशा आजाराने निधन झाले. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. शहरातील प्रतिष्ठित हॉटेल मालक अनिल बापूसाहेब निमसे यांची पुतणी व सुनील बापूसाहेब निमसे यांची मुलगी होत.
फोटो आहे