प्रवरा कालव्यात तरूणाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 15:14 IST2018-08-22T15:14:10+5:302018-08-22T15:14:14+5:30
संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथिल राहुल दत्तू वर्पे (वय-३२) या तरुणाचा प्रवरा उजव्या कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज सकाळी घडली.

प्रवरा कालव्यात तरूणाचा बुडून मृत्यू
आश्वी : संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथिल राहुल दत्तू वर्पे (वय-३२) या तरुणाचा प्रवरा उजव्या कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज सकाळी घडली.
राहुल वर्पे हा सकाळी आपल्या शेताकडून घराकडे येत होता. ओझर येथील स्मशानभूमी जवळ असलेल्या जुन्या पुलाशेजारी येताचंं त्याची दुचाकी घसरल्याने तो तरुण थेट प्रवरा उजव्या कालव्यात जाऊन पडला. यावेळी गावातील शंभर ते सव्वाशे तरुणांनी शोधाशोध केली. तरुणांच्या शोधानंतर राहुल वर्पे याचा मृतदेह सापडला असून तो उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी आश्वीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय उजे, गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेगाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. दुर्देवी निधनाने ओझर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.