बेकायदा वाळू उपशाची जिल्हाधिका-यांकडून गंभीर दखल, कोपरगावातील वाळू उपसा थांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:28 IST2018-05-16T13:27:21+5:302018-05-16T13:28:07+5:30
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील वाळू उपशाची गंभीर दखल जिल्हाधिका-यांनी घेत हाउपसा बंद करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी तात्काळ दूरध्वनीवरून तहसीलदार किशोर कदम यांना वाळू उपसा थांबविण्याचे आदेश आज दिले आहेत.

बेकायदा वाळू उपशाची जिल्हाधिका-यांकडून गंभीर दखल, कोपरगावातील वाळू उपसा थांबविला
अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील वाळू उपशाची गंभीर दखल जिल्हाधिका-यांनी घेत हाउपसा बंद करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी तात्काळ दूरध्वनीवरून तहसीलदार किशोर कदम यांना वाळू उपसा थांबविण्याचे आदेश आज दिले आहेत.
शासनाने कोपरगाव मायगाव देवी वाळूचे लिलाव दिले गेले आहेत. मात्र, नियमांची पायमल्ली करत पोकलेनसारखी मशिनरी व दररोज दोनशेहून अधिक वाहने लावून येथे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरु आहे. गोदापात्रात वाहने उभी असल्याचे छायाचित्रच ‘लोकमत’ने मंगळवारी प्रकाशित केले होते. त्यानंतर कोपरगावच्या तहसील कार्यालयाचे वाहन दुपारी गोदावरी पात्रात येऊन गेले. ठेक्यापेक्षा अधिक वाळू उपसली गेल्याचे दिसत असून तहसीलदारांनी कारवाई केली नाही.
याबाबत जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी आज गंभीर दखल घेतली. ठेकेदाराने आतापर्यत किती वाळू उपसली याचे मोजमाप करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अधिक वाळू उपसली असेल तर दंड आकारण्याचे आदेश व्दिवेदी यांनी दिले आहेत. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे नदीपात्रात पाणी असतानाही वाळू ठेका दिला गेला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी स्वत: पाहणी करणार आहेत.