माजी नगराध्यक्षासह सात जणांवर गुन्हा
By Admin | Updated: April 25, 2016 23:21 IST2016-04-25T23:12:28+5:302016-04-25T23:21:54+5:30
पाथर्डी : शहराचे माजी नगराध्यक्ष अॅड़ दिनकर पालवे यांच्यासह सात जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गुन्हा सोमवारी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

माजी नगराध्यक्षासह सात जणांवर गुन्हा
पाथर्डी : शहराचे माजी नगराध्यक्ष अॅड़ दिनकर पालवे यांच्यासह सात जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गुन्हा सोमवारी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद महादेव ठकाजी कदम (रा.आगसखांड) यांनी दिली आहे.
कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शनिवारी आगसखांड येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्रा होती. रात्री छबीना मिरवणूक निघाली होती़ दर्शन घेण्यासाठी मी दुचाकीवरून गेलो असता त्या ठिकाणी असलेले अॅड. दिनकर पालवे व इतर सहाजणांनी मला जातीवाचक शिवीगाळ करीत हाताने व काठीने मारहाण केली. हे सर्व सोडविण्यासाठी माझी पत्नी झुंबरबाई व चुलते मारूती कदम आले असता त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी माजी नगराध्यक्ष अॅड. दिनकर पालवे यांच्यासह बाळासाहेब भागुजी भाबड, भास्कर दिनकर भाबड, कैलास गणपत भाबड, भागचंद विक्रम भाबड, महादेव शंकर भाबड, संभाजी पंढरीनाथ भाबड (सर्व रा. आगसखांड) या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास डीवायएसपी दत्तात्रय कांबळे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)