दोन एकर उसात तब्बल सात आंतरपिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:20 IST2021-05-19T04:20:23+5:302021-05-19T04:20:23+5:30

आप्पासाहेब हापसे यांना जेमतेम अडीच एकर शेती. शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक वर्षांपासून पशुपालन करतात. त्यासाठी अर्धा एकर क्षेत्र ...

Seven intercrops in two acres of sugarcane | दोन एकर उसात तब्बल सात आंतरपिके

दोन एकर उसात तब्बल सात आंतरपिके

आप्पासाहेब हापसे यांना जेमतेम अडीच एकर शेती. शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक वर्षांपासून पशुपालन करतात. त्यासाठी अर्धा एकर क्षेत्र चारापीक आहे. दोन एकर उसाचा खोडवा राखला. यापूर्वी सुरू उसात गहू, कोबी, मका हे पीक आंतरपीक म्हणून अनेक वेळा घेतले. यंदा मात्र थोड्या-फार प्रमाणात का होईना, परंतु तब्बल सात प्रकारचे आंतरपीक म्हणून काकडी, गवार, पालक भाजी, मुळा, कोथिंबीर, मेथी भाजी, कोबी यासह मका हे आंतरपीक घेतले आहे. मुख्य असलेल्या ऊस पिकाची वाढ अतिशय जोमात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरेसा वेळ आहे. त्यामुळे खुरपणी वरच्यावर सुरू असल्याने ऊस अन् सर्व आंतरपीक जोमात आहे. कीडरोग फवारणी व्यतिरिक्त गवताचा एकही फवारा नाही. खुुरपणीचा दुहेरी फायदा जनावरांना गवत म्हणून चाराही होत आहे.

पालक भाजी, काकडी, गवार आठ दिवसांपासून निघायला सुरुवात झाली. कोबी आगामी दहा-बारा दिवसांत निघेल. दरम्यान, मका एकाच वेळी तोडून मूरघास तयार करण्याच्या विचारात आहे. कोथिंबीर अन् मेथी भाजी उसाच्या खोडव्यात आतापर्यंत दोन वेळा घेतली. आठ दिवसांत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

.......

उसात आंतरपीक म्हणून थोड्या प्रमाणात आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद असला, तरी हात विक्री करण्यास सोपे जाते. सात आंतरपिकांऐवजी एकच पीक असते, तर एवढा माल एकाच वेळी विकणे कठीण झाले असते.

- आप्पासाहेब हापसे शेतकरी, ब्राह्मणी

Web Title: Seven intercrops in two acres of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.