नगरमधील हल्ल्यात सात जखमी

By Admin | Updated: July 3, 2017 04:16 IST2017-07-03T04:16:16+5:302017-07-03T04:16:16+5:30

मनसेचे माजी श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष सुभाष चौधरी व त्याच्या साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांवर

Seven injured in attack in city | नगरमधील हल्ल्यात सात जखमी

नगरमधील हल्ल्यात सात जखमी

 लोकमत न्यूज नेटवर्क
काष्टी (जि. अहमदनगर) : मनसेचे माजी श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष सुभाष चौधरी व त्याच्या साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांवर तलवार, हॉकी स्टीक, गज, काठीने खुनी हल्ला केला. यात सात जण जखमी झाले असून, त्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील चौधरी मळ्यात ही घटना घडली. या वेळी हल्लेखोरांनी दोन कार, ट्रॅक्टर व मोटारसायकलचीही मोडतोड केली.
जखमींपैकी श्रीकृष्ण मखरे, इंदुबाई गोरे (७५) व मंगल गोरे (४०) यांची प्रकृती गंभीर आहे.
याप्रकरणी सुभाष चौधरी, वैशाली चौधरी, शुभांगी चौधरी, वैभव चौधरी (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा), तर गणेश दरेकर (रा. गोपाळवाडी, ता. दौंड जि.पुणे), ऋतिक लगड (रा. श्रीगोंदा), गणेश कचरे (रा. अजनूज, ता. श्रीगोंदा) यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Seven injured in attack in city