मतपत्रिकेचा फोटो काढल्याने सात दिवसांचा कारावास
By Admin | Updated: February 23, 2017 04:03 IST2017-02-23T04:03:26+5:302017-02-23T04:03:26+5:30
मतदान करताना मतपत्रिकेचा मोबाईलमध्ये काढलेला फोटो एका मतदाराला चांगलाच महागात पडला

मतपत्रिकेचा फोटो काढल्याने सात दिवसांचा कारावास
अहमदनगर : मतदान करताना मतपत्रिकेचा मोबाईलमध्ये काढलेला फोटो एका मतदाराला चांगलाच महागात पडला. मतदान प्रक्रियेच्या गुप्ततेचा भंग केल्याबद्दल त्यास न्यायालयाने एक हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान झाले. त्यात राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मतदान केंद्र क्रमांक १५० मध्ये बाबासाहेब दत्तू तोंडे हे मतदान केंद्रात मोबाइल फोन घेऊन गेले. मतदान केल्यानंतर त्यांनी मतपत्रिकेचा फोटो मोबाइलमध्ये काढला. मतदान प्रक्रियेच्या गुप्ततेचा भंग केल्याबद्दल शिवाजी तोंडे यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तोंडे यांना अटकही झाली. (प्रतिनिधी)