संगमनेर तालुक्यात सात कोरोना पॉझिटिव्ह आढळले; ११५ जणांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:39 IST2020-07-18T12:38:58+5:302020-07-18T12:39:59+5:30
संगमनेर तालुक्यातील कुरण, गुंजाळवाडी व शिबलापूर या गावांमध्ये शनिवारी (१८ जुलै) सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी यांनी दिली.

संगमनेर तालुक्यात सात कोरोना पॉझिटिव्ह आढळले; ११५ जणांवर उपचार सुरू
संगमनेर : तालुक्यातील कुरण, गुंजाळवाडी व शिबलापूर या गावांमध्ये शनिवारी (१८ जुलै) सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी यांनी दिली.
कुरणमधील ३० वर्षीय महिलेसह १५ व १६ वर्षीय दोन मुली, गुंजाळवाडीतील ३२ वर्षीय महिलेसह १६ व १७ वर्षीय दोन मुले तर शिबलापूर येथील ४३ वर्षीय पुरूष अशा एकूण सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
नगर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण आतापर्यंत संगमनेर तालुक्यात आढळून आले. ही संख्या ३३९ इतकी आहे. तालुक्यातील १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २१० जण कोरोनामुक्त झाले असून ११५ जणांवर जिल्हा सामान्य रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व काही खासगी रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.