मतदारनोंदणी विशेष मोहिमेची सांगता
By Admin | Updated: July 1, 2014 00:14 IST2014-06-30T23:24:07+5:302014-07-01T00:14:56+5:30
अहमदनगर : जिल्हा निवडणूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमाकडे नवमतदारांनी तसेच नावे वगळल्या गेलेल्या मतदारांनी कानाडोळा केला.
मतदारनोंदणी विशेष मोहिमेची सांगता
अहमदनगर : जिल्हा निवडणूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमाकडे नवमतदारांनी तसेच नावे वगळल्या गेलेल्या मतदारांनी कानाडोळा केला. त्यामुळे या मोहिमेला प्रतिसाद मिळाला नाही.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांची नावनोंदणी केली जात आहे. दि. ९ पासून २७ जूनपर्यंत केवळ ७ हजार ७३० नवमतदारांनी नोंदणी केली आहे. शनिवार आणि रविवारी प्रत्येक केंद्रावर जाऊन बीएलओंनी नोंदणी केली. त्यासही अल्प प्रतिसाद मिळाला.
लोकसभा निवडणुकीवेळी नाव वगळल्याच्या तक्रारी करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यांनी या नावनोंदणी मोहिमेकडे पाठ फिरवली. स्थलांतरीत, नावातील त्रुटींसंदर्भात अर्ज भरून घेण्यात आले. जिल्ह्यात ३ हजार ५३७ मतदान केंद्र आहेत. तेथे शनिवार व रविवारी नावनोंदणी केली.दि. १ जानेवारी २०१४ रोजी ज्या तरूणांना १८ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांची नावनोंदणी करण्यात आली. (प्रतिनिधी)
दोन दिवसांच्या विशेष मोहिमेतील आकडेवारी
अकोले - ३३०, कोपरगाव - १४६८, श्रीरामपूर - १०४, नेवासा - २४३, शेवगाव - १५७, पाथर्डी - १२२, कर्जत - १४९, श्रीगोंदा - १८६, पारनेर - २७९. ही नवमतदारांच्या अर्जांची संख्या आहे.
तब्बल महिनाभर नोंदणीसाठी वेळ देण्यात आला होता. यासाठी राबविलेल्या मोहिमेची सांगता जून रोजी झाली. यापुढे नावनोंदणी करता येणार नाही. बदलही सूचविता येणार नाही.
-सुनील माळी,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी.