सेट टॉप बॉक्सच्या किमतीबाबत संभ्रम!

By Admin | Updated: December 16, 2015 23:06 IST2015-12-16T22:30:03+5:302015-12-16T23:06:31+5:30

अहमदनगर : सेट टॉप बॉक्सच्या किमतीवरून शहरासह जिल्ह्यात चांगलाच गोंधळ सुरू झाला असून, एक बॉक्स बसविण्यासाठी एक ते दीड हजाराची मागणी केली जात आहे़

Set top box price confusion! | सेट टॉप बॉक्सच्या किमतीबाबत संभ्रम!

सेट टॉप बॉक्सच्या किमतीबाबत संभ्रम!

अहमदनगर : सेट टॉप बॉक्सच्या किमतीवरून शहरासह जिल्ह्यात चांगलाच गोंधळ सुरू झाला असून, एक बॉक्स बसविण्यासाठी एक ते दीड हजाराची मागणी केली जात आहे़ त्यामुळे केबलधारक बॉक्स बसविण्यास सपशेल नकार देऊ लागले आहेत़ विशेष म्हणजे बॉक्सच्या किमतीबाबत शासनाचेही निर्देश नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे़
शासनाच्या करमणूक विभागाकडून केबलधारकांना सेट टॉप बॉक्स बसविण्याची योजना सुरू केली़ बॉक्स बसविण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे़ दिलेल्या मुदतीत सेट टॉप बॉक्स न बसविल्यास केबल सेवा खंडित करण्याचे फर्मान जारी करण्यात आले आहे़ शहरासह जिल्ह्यात एकूण ४६ हजार ७४० केबलधारक आहेत़ यापैकी १९ हजार शहर व परिसरातील आहेत़ शहर व परिसरात १०३ केबल आॅपरेटर आहेत़ आॅपरेटरांकडून सेट टॉप बॉक्स बसविण्याची तयारी सुरू आहे़ त्यांनी विविध कंपन्यांचे सेट टॉप बॉक्स खरेदीही केले आहेत़ सेट टॉप बॉक्सची किंमत एक ते दीड हजार रुपये आहे़
महिना दोनशे रुपयांत मिळणाऱ्या केबल सेवेसाठी एकदम एक ते दीड हजार रुपये का द्यायचे, असा प्रश्न केबलधारकांकडून उपस्थित केला जात आहे़ सेट टॉप बस्विल्यानंतर चॅनल्सची संख्याही वाढेल़ त्याचबरोबर चित्र सुस्पष्ट दिसण्यासही मदत होईल़ परंतु, एकदम दीड हजार देणे शक्य नाही, असे केबलधारकांचे म्हणणे आहे़ केबल जोडणी कायम ठेवायची असल्यास दिलेल्या मुदतीत बॉक्स बसविणे बंधनकारक आहे़ बॉक्स दर्जेदार कंपनीचाच मागविण्यात आला आहे़ त्यामुळे एक ते दीड हजार रुपये लागतात़ मात्र ते देण्यास केबलधारक तयार होत नाहीत़ त्यामुळे बॉक्स बसविण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केबल आॅपरेटरांनी आढावा बैठकीत केली़ मुदतवाढीबाबत वरिष्ठ कार्यालयांकडून निर्णय होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे़
सेट टॉप बॉक्स बसविणे सक्तीचे करण्यात आले़ पण, किमतीवर शासनाचेही नियंत्रण नाही़ यासंदर्भात कोणतेही निर्देश नाहीत, असे सांगून महसूलच्या अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहेत़ त्यामुळे तक्रार करायची कुणाकडे, असा प्रश्न केबलधारकांसमोर आहे़

Web Title: Set top box price confusion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.