भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या मारहाण प्रकरणी आरोपींना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:15 IST2018-09-01T14:14:59+5:302018-09-01T14:15:13+5:30
चार वर्षांपूर्वी शहरात झालेल्या दोन गटातील वादात मध्यस्थी करून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस जबर मारहाण करणा-या आरोपी अमोल दिलीप लकारे यास नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल.टिकले यांनी दोन वर्षे मुदतीचा बंधपत्र व एक लाख दंडाची शिक्षा सूनवण्यात आली.

भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या मारहाण प्रकरणी आरोपींना शिक्षा
नेवासा : चार वर्षांपूर्वी शहरात झालेल्या दोन गटातील वादात मध्यस्थी करून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस जबर मारहाण करणा-या आरोपी अमोल दिलीप लकारे यास नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल.टिकले यांनी दोन वर्षे मुदतीचा बंधपत्र व एक लाख दंडाची शिक्षा सूनवण्यात आली.
सदर घटनेची थोडक्यात माहिती अशी, नेवासा येथील राम मंदिराजवळील गणपती चौकात नागेश्वर लचोरे व अमोल लकारे यांची भांडणे चालू होती. हे भांडण सोडविण्यास गेलेल्या सचिन माणिक गरुटे या तरुणास रागातून अमोल दिलीप लकारे, सागर कचरू पंडुरे, राहुल हरिभाऊ जाधव, प्रवीण बाबासाहेब कोरेकर यांनी हातातील काठ्यांनी हाता- पायावर व डोक्यावर मारहाण केली. त्यात सचिन याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला. त्याच्यावर वेळीच शस्त्रक्रिया झाल्याने त्याचा जीव वाचला. सदर घटनेबाबत कुमार गरुटे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी विरोधात गुन्हा राजि.नं २७१/२०१४ चा भदवी कलम ३०७ ,३२६, ३२३, ५०४, ५०६ गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस.जी.जोशी यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
खटल्याची सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. समोर आलेला पुरावा व सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अमोल दिलीप लकारे यास शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल एम.आर.नवले यांनी कामकाज पाहिले.