सेनेच्या भांगरे विजयी
By Admin | Updated: April 19, 2016 00:36 IST2016-04-19T00:11:24+5:302016-04-19T00:36:10+5:30
अहमदनगर : महापालिका प्रभाग क्रमांक तीनच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे कृष्णा गायकवाड यांचा पराभव करत सेनेच्या प्रतिभा विजय भांगरे ३४८ मतांनी विजयी झाल्या.

सेनेच्या भांगरे विजयी
आंदोलन : आंतरजिल्हा बदल्यांबाबत ठोस निर्णय घ्या
अमरावती : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या मुद्यावर शासनाने अद्याप कोणताच निर्णय न घेतल्याने सोमवार १८ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. शिक्षक आंतरजिल्हा बदली संघर्ष कृती समितीतर्फे आयोजित या आंदोलनात शिक्षक सहकुटुंब सहभागी झाले होते.
मागील पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतर जिल्हा बदलीकरिता ताटकळत ठेवण्याचा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न शिक्षक आंतरजिल्हा बदली संघर्ष समितीतर्फे करण्यात आला आहे. असे असतानाही शासनाने यासंदर्भात कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही. विशेष म्हणजे अशा स्वरुपाच्या बदलीचे धोरण असताना त्याची अंमलबजावणी होत नाही. शिक्षकांच्या प्रवर्गनिहाय रिक्त अतिरिक्त जागांचा तपशीलदेखील उपलब्ध नाही. शिक्षक संवर्गाची बिंदूनामावली सुद्धा मागील पाच वर्षापासून अद्ययावत करण्यात आलेली नाही. समायोजन, पदोन्नती प्रक्रिया सुद्धा रखडली असल्याचे संघर्ष कृती समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे या मुद्यावर ठोस भूमिका घेऊन शिक्षकांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून सीईओकडे केली आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश ठाकरे, एल.बी. केंद्र, एम.एस. राठोड, पी.सी. सोनार, ए.आर. वांगे, श्याम खुंटे, राधिका इमानदार, स्वाती पानझाडे, निखिल संभे, राजेश कांबळे, एम.एन. धस, विनोद राठोड, आर.पी. बकाले यांचा समावेश होता.