काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब देशमुख यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 12:46 IST2018-01-19T12:45:33+5:302018-01-19T12:46:00+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अहमदगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष केशवराव रावसाहेब व बापूसाहेब देशमुख (वय ८५) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले.

Senior Congress leader Bapusaheb Deshmukh passed away | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब देशमुख यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब देशमुख यांचे निधन

कर्जत : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अहमदगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष केशवराव रावसाहेब व बापूसाहेब देशमुख (वय ८५) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले.
कर्जत पंचायत समितीचे ते सलग १८ वर्षे सभापती होते. जगदंबा सहकारी साखर कारखाना उभारणीत आबासाहेब निंबाळकर यांच्यासोबतच देशमुख यांचाही सिंहाचा वाटा होता. कर्जत तालुक्यताील सहकार वाढविण्यासाठी देशमुख यांनी मोलाचे योगदान दिले. जगदंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेचे मार्गदर्शक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. जिल्हा सहकारी बँकेवर ते सलग २५ वर्षे संचालक म्हणून कार्यरत होते.

Web Title: Senior Congress leader Bapusaheb Deshmukh passed away