अहमदनगरच्या नव्या महापौर म्हणून सेनेच्या रोहिणी शेंडगे यांची निवड बिनविरोध होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 13:58 IST2021-06-29T13:56:53+5:302021-06-29T13:58:29+5:30
महापौर-उपमहापौर निवड बिनविरोध होणार, महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांचा तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.

अहमदनगरच्या नव्या महापौर म्हणून सेनेच्या रोहिणी शेंडगे यांची निवड बिनविरोध होणार
अहमदनगर : महापौर-उपमहापौर निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला आहे.
महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांचा तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. या दोन्ही पदासाठी नाराज असलेलूया काँग्रेसने आज माघार घेतली असून अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे आता केवळ औपचारिकता बाकी राहिली असून बुधवारी अधिकृत निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दीड वाजता संपली. काँग्रेसकडून एकही अर्ज दाखल झाला नाही.त्यामुळे शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची महापौरपदी तर राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड होण्यातील अडथळे दूर झाले आहेत.