Ahmednagar: सेनेचे गणेश कवडे सभापती, सभागृह नेतापदी राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुधे, स्थायी समिती निवड बिनविरोध
By अरुण वाघमोडे | Updated: March 2, 2023 14:36 IST2023-03-02T14:35:54+5:302023-03-02T14:36:21+5:30
Ahmednagar: अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे (ठाकरे गट) नगरसेवक गणेश कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Ahmednagar: सेनेचे गणेश कवडे सभापती, सभागृह नेतापदी राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुधे, स्थायी समिती निवड बिनविरोध
- अरुण वाघमोडे
अहमदनगर: महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे (ठाकरे गट) नगरसेवक गणेश कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि 2) सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. दरम्यान राष्ट्रवादीचे नगरसेवक विनीत पाऊलबुधे यांना महापौर रोहिणी शेंडगे यांनी सभागृह नेतेपदी निवड करत असल्याचे पत्र दिले.
स्थायी समिती सभापती पदासाठी कवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने छाननी नंतर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी कवडे यांची निवड बिनविरोध होत असल्याची घोषणा केली. यावेळी स्थायी समितीचे सदस्य विनीत पाऊलबुधे, नजीर शेख, सुनील त्र्यंबके, प्रदीप परदेशी, पल्लवी जाधव, संपत बारस्कर, मंगल लोखंडे यांच्यासह मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे, नगर सचिव एस.बी तडवी आदी उपस्थित होते. दरम्यान या निवडीनंतर सेना-राष्ट्रवादीतील अंतर्गत तडजोडीनुसार महापौर शेंडगे यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक विनीत पाऊलबुधे यांना सभागृहनेते पदाचे पत्र दिले. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.