श्री इम्पेक्सतर्फे आत्मनिर्भर समर्पण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:23 IST2021-09-27T04:23:13+5:302021-09-27T04:23:13+5:30
अहमदनगर : महाएनजीओ फेडरेशन पुणे यांच्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती आणि महात्मा गांधी यांच्या ...

श्री इम्पेक्सतर्फे आत्मनिर्भर समर्पण अभियान
अहमदनगर : महाएनजीओ फेडरेशन पुणे यांच्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आत्मनिर्भर सेवा समर्पण अभियान राबविण्यात आले. श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल, उक्कलगाव येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ‘आरोग्यावर बोलू काही’ या विषयावर व्याख्यान झाले. तसेच आरोग्य तपासणी शिबिर, विद्यार्थ्यांना फळवाटप, स्वच्छता अभियान, लसीकरण जनजागृती कार्यक्रम झाला. डॉ. तोफिक शेख यांनी आरोग्य तपासणी केली. ‘पत्रकारिता ते समाजकार्य’ या विषयावर ॲड. प्रवीण जमदाडे व प्रियांका यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी खासदार गोविंदराव आदिक शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. जयंत चौधरी, ग्रामीण रुग्णालयाचे प्रसन्न धुमाळ, फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज सूर्यवंशी, संचित आदिक, आरती ठोकळ, शाळेच्या मुख्याध्यापिका औताडे आदी उपस्थित होते. प्रा. बबन तागड यांनी मार्गदर्शन केले. (वा. प्र.)
---
फोटो-२६ श्रीईम्पेक्स
श्री इम्पेक्सतर्फे आत्मनिर्भर समर्पण अभियानांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. या प्रसंगी वक्त्यांचा सत्कार करताना जयंत चौधरी, प्रसन्न धुमाळ, सूरज सूर्यवंशी आदी.