महाराष्ट्र केसरीसाठी मल्लांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:30 IST2021-02-23T04:30:39+5:302021-02-23T04:30:39+5:30

या स्पर्धेतून गादी विभागसाठी सौरभ जाधव, कौस्तुभ आंबेकर, लक्ष्मण धनगर, चैतन्य शेळके, विशाल मेहेत्रे, ऋषिकेश लांडे, राहुल ताकवणे, युवराज ...

Selection of wrestlers for Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरीसाठी मल्लांची निवड

महाराष्ट्र केसरीसाठी मल्लांची निवड

या स्पर्धेतून गादी विभागसाठी सौरभ जाधव, कौस्तुभ आंबेकर, लक्ष्मण धनगर, चैतन्य शेळके, विशाल मेहेत्रे, ऋषिकेश लांडे, राहुल ताकवणे, युवराज खैरे यांची, तर माती विभागासाठी करण मिसाळ, निखिल शिंदे, किरण धनगर, बंटी साबळे, मयूर जपे, आदेश डोईजड यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र केसरी गटासाठी तुषार अरुण (माती) व महेश लोंढे (गादी) या मल्लांची निवड झाली. या निवड चाचणीसाठी पंच म्हणून संभाजी निकाळजे व नाना डोंगरे यांनी काम पाहिले.

माजी नगरसेवक संभाजी लोंढे यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करून स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, खजिनदार नाना डोंगरे, उपमहाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ, विलास चव्हाण, नगर शहर तालीम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे, उपाध्यक्ष सुनील भिंगारे, बजरंग महांकाळ, सचिव मोहन हिरणवाळे, कार्याध्यक्ष अजय अजबे, खजिनदार कैलास हुंडेकरी, पै. काका शेळके, पै. संग्राम शेळके, सुरेश आंबेकर, तुषार अरुण आदींसह मल्ल उपस्थित होते.

लांडगे म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात कुस्ती मल्लांचे मोठे नुकसान झाले. सराव, व्यायाम व खुराकाचा प्रश्‍न बिकट बनला असताना शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या कुस्ती स्पर्धा जाहीर झाल्या असून, त्या अनुषंगाने निवड चाचणी स्पर्धा कोरोनाच्या नियमांचे पालन करून होत आहेत.

फोटो २१ कुस्ती

ओळी - महाराष्ट्र केसरी व राज्यस्तरीय वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी नगर शहर तालीम सेवा संघाच्या वतीने मल्लांची निवड चाचणी घेण्यात आली.

Web Title: Selection of wrestlers for Maharashtra Kesari