स्वप्नील पुरनाळे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:18 IST2021-05-30T04:18:53+5:302021-05-30T04:18:53+5:30

.......................... अल्तमश पटेल युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी श्रीरामपूर : अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी अल्तमश अन्सार पटेल यांची ...

Selection of Swapnil Purnale | स्वप्नील पुरनाळे यांची निवड

स्वप्नील पुरनाळे यांची निवड

..........................

अल्तमश पटेल युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी अल्तमश अन्सार पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी पटेल यांच्या नियुक्तीचे पत्र दिले. प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या हस्ते हे पत्र अल्तमश पटेल यांना देण्यात आले. त्यांची पत्नी अक्सा पटेल यासुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका आहेत. अल्तमश पटेल यांना नियुक्तीचे पत्र देण्याप्रसंगी पुष्पलता आदिक, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष लकी सेठी, नगरसेवक राजेंद्र पवार, जयंत चौधरी व प्रदीप आहेर उपस्थित होते.

...............

प्राथमिक आरोग्‍य केंद्रास रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न

आश्वी : निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रास ग्रामविकास विभागाच्‍या माध्‍यमातून मिळालेल्‍या रुग्‍णवाहिकेचे लोकार्पण रुग्‍ण कल्‍याण समितीच्‍या अध्‍यक्षा ॲड. रोहिणी निघुते यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी डॉ. विखे पाटील कारखान्‍याचे संचालक रामभाऊ भुसाळ, कैलास तांबे, माजी उपसभापती मच्छिंद्र थेटे, सरपंच अमोल जोंधळे, विजय डेंगळे, जोर्वे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गो‍कूळ दिघे, औरंगपूरचे उपसरपंच इंद्रभान तांबे, वैद्यकीय अधिकारी तय्युब तांबोळी त्‍यांचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्‍य केंद्रास रुग्‍णवाहिका उपलब्‍ध झाल्‍याने निमगावजाळी प्राथमिक आरोग्‍या केंद्राच्‍या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांच्‍या नागरिकांना फायदा होईल.

Web Title: Selection of Swapnil Purnale