सोनाली मंडलिकची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:26 IST2021-09-15T04:26:01+5:302021-09-15T04:26:01+5:30

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणेअंतर्गत इंदापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. याशिवाय धुळे ...

Selection of Sonali Mandlik for National Wrestling Championship | सोनाली मंडलिकची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

सोनाली मंडलिकची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणेअंतर्गत इंदापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. याशिवाय धुळे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ज्युनिअर गटातून प्रथम क्रमांक पटकावला होता. राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत तिने अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत.

मंडलिक हिच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. कांबळे यांनी सत्कार करून तिचे कौतुक केले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहित पवार, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर व बप्पासाहेब धांडे, उपप्राचार्य प्रा. भास्कर मोरे यांनी मंडलिक हिचे काैतुक केले. शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, प्रा. शिवाजी धांडे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

..........

सोनाली मंडलिक हिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी तिचा सत्कार केला.

Web Title: Selection of Sonali Mandlik for National Wrestling Championship