नेवासा : सोनई (ता. नेवासा) येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची एनकोअर हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड पैठण, औरंगाबाद या नामांकित कंपनीत उत्पादन, क्वालिटी कंट्रोल व पॅकिंग विभागात निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. के. देशमुख यांनी दिली.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत ऑनलाइन कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. त्यात महाविद्यालयाचे विद्यार्थी वैभव शेजुळ, राजदेव स्वामिदत्त, विकास गव्हाणे, अक्षय कोते, अनिकेत नवले, अनुजा काते व प्रतीक्षा दहातोंडे यांची निवड झाली आहे. महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागामार्फत दरवर्षी नामांकित कंपन्यांना बोलावून थेट मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच सद्यस्थितीतील उपलब्ध नोकरीच्या संधीबाबत मार्गदर्शन केले जाते. या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक माजी खासदार यशवंतराव गडाख, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, अध्यक्ष प्रशांत गडाख, उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. व्ही. के. देशमुख, उपप्राचार्य डॉ. विलास घावटे, प्लेसमेंट विभाग प्रमुख ए. व्ही. घुले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.