‘संजीवनी’च्या सात विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:28+5:302020-12-15T04:36:28+5:30
कोपरगाव : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने अलीकडेच कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हअंतर्गत सात विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी ...

‘संजीवनी’च्या सात विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड
कोपरगाव : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने अलीकडेच कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हअंतर्गत सात विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
कोल्हे म्हणाले, संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आपले सातत्य कायम ठेवून यश संपादन केले आहे. अलीकडेच झालेल्या कॅम्प्स प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत सीटीएसआयएल या भारतभर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ओंकार विनोद डागा, सायली नंदुू चौधरी, अंकुश अशोक कुमार व स्नेहा दिलीप चिने या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यांना प्रशिक्षण काळात इतर सोयी सवलतींबरोबरच ३ लाख ८ हजारांचे वार्षिक पॅकेज देवू केले आहे. तर विप्रो या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह इलेक्ट्रिकल व इलेक्ट्राॅनिक्स मालाचे उत्पादन करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने कावेरी विजय भडांगे, प्रतीक्षा सतीश औताडे व परमेश्वर अंकुश इंगळे यांची सुरूवातीस साडेतीन लाखांचे वार्षिक पॅकेज देवून निवड केली आहे. सर्व पालकांनी कोरोना कठीण काळातही त्यांच्या पाल्यांना नोकरी देवून कुटुंबास आधार दिल्याबद्दल संजीवनीच्या प्रयत्नांसाठी आभार व्यक्त केले.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे कौतुक केले. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक प्राचार्य डाॅ. डी. एन. क्यातनवार यांचे मार्गदर्शन लाभले. (वा. प्र.)
-------
फोटो१४- अमित कोल्हे, कोपरगाव
141220\amitdada photo.jpg
फोटो१४- अमित कोल्हे, कोपरगाव