पोतराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST2020-12-22T04:20:51+5:302020-12-22T04:20:51+5:30
राहुरी : महाराष्ट्र पोतराज सेना व महालक्ष्मी पोतराज बहुउद्देशीय संस्थेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी संस्थापक अध्यक्ष रामदास कनगरे, संस्थेचे कार्याध्यक्ष ...

पोतराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी
राहुरी : महाराष्ट्र पोतराज सेना व महालक्ष्मी पोतराज बहुउद्देशीय संस्थेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी संस्थापक अध्यक्ष रामदास कनगरे, संस्थेचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जगधने व मार्गदर्शक बबनराव वाकचौरे यांच्या उपस्थित करण्यात आल्या. यात राहुरीच्या अध्यक्षपदी सुरेश जगधने यांची निवड झाली.
औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी शंकर सौदागर यांची तर महाराष्ट्र राज्य संघटकपदी देविदास वैरागर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी देविदास शिरसाट, महाराष्ट्र सरचिटणीसपदी अशोक क्षीरसागर, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी लखन ससाने, अहमदनगर जिल्हा सचिवपदी लाला लोखंडे, राहुरी तालुकाध्यक्षपदी सुरेश जगधने, राहुरी तालुका उपाध्यक्षपदी नवनाथ भाग्यवंत, राहुरी तालुका सचिवपदी नामदेव शिरोळे व आकाश वैरागर यांची निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर ससाने, अशोक माळी, अरुण बोरगे, मारुती ससाने, मुरलीधर ससाने, चंदाबाई वाघ, शुभम जगधने, रामनाथ पांढरे, पोपट दिवे, पप्पू वैरागर, सोमनाथ वैरागर, प्रसाद गायकवाड, लखन चांदणे, रमेश बाबा भारस्कर, मनोज वैरागर, सचिन वैरागर, सचिन जोगदंड आतुल वाघमारे, रामेश्वर कदम, आदित्य खरात, लखन साळुंखे, जमनाबाई जगधने, उषा भारस्कर, मंगल बताशे, लता खरात, विजया खरात, पांडुरंग बर्डे, शकुंतला वाघमारे आदी उपस्थित होते.