राहाता, नगरची पीकनिहाय आराखडा प्रकल्पासाठी निवड
By Admin | Updated: July 24, 2016 23:59 IST2016-07-24T23:43:32+5:302016-07-24T23:59:47+5:30
राहुरी : कृषी विद्यापीठाच्या वतीने तालुकानिहाय पीक पद्धती आराखडा तयार करण्यात येणार असून अशा प्रकारचा उपक्रम देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे़

राहाता, नगरची पीकनिहाय आराखडा प्रकल्पासाठी निवड
राहुरी : कृषी विद्यापीठाच्या वतीने तालुकानिहाय पीक पद्धती आराखडा तयार करण्यात येणार असून अशा प्रकारचा उपक्रम देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे़ त्यासाठी नगर जिल्ह्यातील राहाता व नगर तालुक्यांची निवड झाली आहे़
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशीय कार्यशाळेत विस्तार शिक्षण संचालक डॉ़ किरण कोकाटे यांनी माहिती दिली़ आपत्कालीन व्यवस्थापन व हवामान बदलानुसार नियोजन करण्याचे नियोजन करण्यात आले़ हवामान बदलाचा पीक उत्पादनावर परिणाम होत आहे़
शेतकऱ्यांना यासंदर्भात माहिती देऊन उत्पादन वाढविण्यात येणार असल्याचे डॉ़ किरण कोकाटे यांनी कार्यशाळेत सांगितले़ पुणे जिल्ह्यातील जुन्नर, वेल्हा, तर नगर जिल्ह्यातील नगर व राहाता तालुक्यांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे़
हैद्राबाद येथील मॅनेज संस्थेचे संचालक डॉ़ व्ही़ पी़ शर्मा यांनी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेताना शेती पद्धतीत बदल करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले़ यावेळी झालेल्या चर्चेत वाय़ जी़ प्रसाद, डॉ़ रवींद्र चँरी, डॉ़ नवीन, डॉ़ नदीम, डॉ़ राजू जर्मन, डॉ़ झाकीर, सोमनाथ चटर्जी, सुभाष खेमनर, सुनील बोरकर, भाऊसाहेब बराटे, प्राचार्य मेघना केळकर यांनी सहभाग घेतला़ कार्यशाळेत देशातील ३०० शास्त्रज्ञ सहभागी झाले होते़
(तालुका प्रतिनिधी)