अहमदनगर महाविद्यालयाच्या ८ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:09+5:302021-07-20T04:16:09+5:30
धनश्री जाधव, ओंकार भस्मे, आयशा सय्यद, प्रकाश जगताप, वैभव निक्रड, तुषार पांडुळे, शुभम येलजले, फहीम माेहम्मद खान या विद्यार्थ्यांची ...

अहमदनगर महाविद्यालयाच्या ८ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांत निवड
धनश्री जाधव, ओंकार भस्मे, आयशा सय्यद, प्रकाश जगताप, वैभव निक्रड, तुषार पांडुळे, शुभम येलजले, फहीम माेहम्मद खान या विद्यार्थ्यांची इन्फोसिस, टीसीएस, कोगनिझंट, इनसोनो, विप्रो अशा कंपनीमध्ये निवड झाली. कंपनीने निवड प्रक्रियेमध्ये अॅप्टिट्यूड परीक्षा व एच.आर. मुलाखत हे राऊंड घेतले. या सर्व राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे बाजी मारत यश मिळविले. प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. बार्नबस म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षण देताना सर्व गोष्टींचा विचार करुन परिपूर्ण शिक्षण दिले जाते. जेणे करुन त्यांना भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊन नये. उच्च दर्जाचे शिक्षण दिल्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात अहमदनगर महाविद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी होतात. प्रत्येक विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राध्यापक करत असतात. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी अहमदनगर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा कल असतो. कोरोनाचे सावट असले तरी शिक्षणात कोणताही खंड पडू दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी चिफ कॉर्डिनेटर डॉ. एन. आर. सोमवंशी, उपप्राचार्य डॉ. बी. एम. गायकर, डॉ. सय्यद रझाक, डॉ. अरविंद नागवडे आणि प्रबंधक दीपक अल्हाट उपस्थित होते.
-------
फोटो - १९ नगर काॅलेज
अहमदनगर महाविद्यालयाच्या विविध विभागातील आठ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांत ऑनलाईन कॅम्पस इंटरह्यूद्वारे निवड झाली.