‘अमृतवाहिनी’च्या ४५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:06 IST2021-01-08T05:06:07+5:302021-01-08T05:06:07+5:30
संगमनेर : अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या ४५ विद्यार्थ्यांची परीक्षेपूर्वीच टाटा कन्सल्टन्सी ...

‘अमृतवाहिनी’च्या ४५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
संगमनेर : अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या ४५ विद्यार्थ्यांची परीक्षेपूर्वीच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीमध्ये निवड झाली आहे, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य डाॅ. एम. ए.व्यंकटेश यांनी दिली.
कॅम्पस मुलाखतीमध्ये टीसीएस या बहुराष्ट्रीय व नामांकित कंपनीमध्ये अमृतवाहिनीच्या सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, ई.टी.सी, आय.टी., मेकॅनिकल, प्रॉडक्शन अशा सर्व विभागातील मयूर पवार, नीलेश खैरनार, श्रेयश कातोरे, चेतन कर्पे, स्वराज पतंगे, विजय पवार, गणेश आवारी, विनायक बाळसराफ, गायत्री भांगरे, हर्षल देवरे, साहिल जैन, सौरभ खुळे, मयूर मुंढे, श्रद्धा पवळे, प्राची परदेशी, विनय गुप्ता, अशिष कोऱ्हाळकर, शिवम गव्हाळे, ईश्वरी यादव, आदित्य कडलग, भागवत कोल्हे, अवधूत कानवडे, गीतांजली ढोकणे, तेजस सातपुते, अभिजित वर्पे, हर्षदा कुटे, नितळ पाटील, गौरी मर्डीकर, प्रसाद मुळे, फैजान देशमुख, अक्षदा हासे, रविकुमार घाडगे, निकिता आवारे, विष्णू लोंढे, प्रतीक खुळे, अक्षय आवारी, मंगेश पळसकर, अश्विनी वाळके, विक्रम सरोदे, गौरव शिंदे, परिक्षित देशमुख, प्रतीक आंबरे, कौस्तुभ गुंजाळ, निखिल जगताप, श्रेयस सातपुते अशा एकूण ४५ विद्यार्थ्यांची ३.३६ ते ७.२० लाख वार्षिक पॅकेजसह निवड झाली आहे. अंतिम वर्षाची परीक्षा दिल्यानंतर हे सर्व विद्यार्थी कंपनीत रुजू होणार आहेत. भविष्यातही विद्यार्थ्यांना कॉग्निझंट, कॅपजेमिनी, महिंद्रा, विप्रो, के.एस.बी., इन्फोसिस, प्राज इण्डस्ट्रीज व परसिस्टंट इत्यादी कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त पॅकेजसह नोकरीची उत्तम संधी मिळेल, अशी खात्री ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. बाळासाहेब साबळे यांनी दिली़
संस्थेचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त आमदार डॉ़ सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, शरयू देशमुख, अनिल शिंदे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (वा.प्र.)