कोपरगाव : संजीवनी के. बी. पी. पाॅलिटेक्निकच्या २८ विद्यार्थ्यांची वाहन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत ट्रेनी इंजिनिअर्स या पदावर निवड केली आहे. अंतिम निकालाअगोरदच निवड होत असल्याचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांमध्ये साक्षी रामदास शेलार, अभिषेक सीताराम माळवदे, श्रध्दा सूर्यकांत मोटे, तुषार एकनाथ बांगर, सुयश अजय लहरे, महिमा गोकुळ चौधरी, सौरभ गणेश गलांडे, संकेत बाळासाहेब कर्पे, प्रियंका बाळासाहेब बोराडे, दीपाली राजेंद्र काळे, विशाल ज्ञानेश्वर रंधे, आदित्य दत्तात्रय सोणवने, नम्रता कमलाकर कसबे, सोनिया राजेंद्र भालेराव, कोमल अमृत चव्हाण, रोहन भगवान रोकडे, ताहिद अमिर शेख, शुभम रावसाहेब बाचकर, अक्षय संजय वाकचौरे, शुभम अनिल घोडेराव, सिध्दार्थ चंद्रकांत कानडे, शुभम दत्तू गुंजाळ, पूजा चांगदेव काळे, सिध्दार्थ कैलास सांगळे, संकेत भरत कानडे, अक्षय सुभाष हिवराळे, ओंकार राजेंद्र बोरावके व सार्थक रमेश शिंदे यांचा समावेश आहे.
.........................
कोपरगाव नगर परिषदेने सुरू केली रॅपिड, आरटीपीसीआर तपासणी मोहीम
कोपरगाव : कोपरगाव नगर परिषदेने कोविड नियंत्रण करण्यासाठी भाजीपाला, फळ विक्रेते व ग्राहक यांची ऑन दि स्पॉट रॅपिड व आरटीपीसीआर स्वॅब तपासणी मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम मुख्याधिकारी तथा सहाय्यक घटना व्यवस्थापक, प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. रविवारी भाजीपाला व फळ विक्रते यांच्या ऑन दि स्पॉट १३० विक्रेत्यांपैकी ७३ विक्रेत्यांच्या रॅपिड टेस्ट केल्या. त्यापैकी २ कोविड पॉझिटिव्ह तर ७१ निगेटिव्ह आढळून आले असून, ५७ आरटीपीसीआर स्वॅब तपासणीसाठी घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहेत. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री कांडेकर यासाठी मेहनत घेत आहेत.