संजीवनीच्या १० विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:35+5:302021-07-09T04:14:35+5:30

कोपरगाव : संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्राॅनिक सुट्या भागांची ...

Selection of 10 students of Sanjeevani | संजीवनीच्या १० विद्यार्थ्यांची निवड

संजीवनीच्या १० विद्यार्थ्यांची निवड

कोपरगाव : संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्राॅनिक सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या रेनाटा प्रिसिझन काम्पोनंटस् प्रा. लि. या कंपनीने दूरदृष्य प्रणालीद्वारे मुलाखत घेऊन संजीवनीच्या अंतिम वर्षातील १० विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.

कोल्हे म्हटले, कोविड १९ च्या काळात अनेकांच्या नोकऱ्या जाऊन हजारो कुटुंब अडचणीत सापडली. अनुभवी अभियंतेच अडचणीत आले तर नवोदित अभियंत्याना कोण नोकरी देणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, अशाही परिस्थितीत उद्योग जगताला आवश्यक असणारे तंत्रस्नेही अभियंते तयार करण्यात संजीवनीने आघाडी घेतली. असल्यामुळे एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या विद्यार्थ्यांची नोकऱ्यांसाठी निवड करीत आहे.

रेनाटामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये साक्षी भोंगळे, अक्षदा आरणे, रेणुका कहार, राजलक्ष्मी मोरे, साहिल झुरळे,जनार्धन गडाख, तेजस उदे, विशाल शिंदे, प्रसाद पगारे व रामकिसन पेहरकर यांचा समावेश आहे. संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत असल्याने माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे यांची ४० वर्षांपूर्वीची दूरदृष्टीता सत्यात उतरत आहे.

सध्या महाराष्ट्र शासनाने पाॅलिटेक्निकच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली. असल्याने अनेक पालक आपले पाल्य वयाच्या १९ व्या वर्षीच कमावते व्हावे, या महत्त्वाकांक्षेने संजीवनमध्येच आपल्या पाल्यास प्रवेश मिळावा, यासाठी संजीवनीच्या मार्गदर्शन केंद्रातून मार्गदर्शन घेत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल शंकरराव कोल्हे, संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांचे भाग्यवान पालक यांचेसह प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचे अभिनंदन केले.

..................

Web Title: Selection of 10 students of Sanjeevani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.