घरात साठविलेला लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:22+5:302021-02-05T06:31:22+5:30
सचिन विठ्ठल शेळके (वय ३६, रा. वडगाव, ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेळके व त्याचा साथीदार ...

घरात साठविलेला लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त
सचिन विठ्ठल शेळके (वय ३६, रा. वडगाव, ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेळके व त्याचा साथीदार बाळासाहेब रामराव जायभाये (रा. पिंपळनेर ता. शिरुर जि. बीड) यांनी वडगाव येथे शेळके याच्या घरात गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली दारू साठवून ठेवली असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागातील भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक अण्णासाहेब बनकर यांना मिळाली होती. छापा टाकला तेव्हा शेळके याच्या घरात म्यकडोल व्हिस्कीचे ५२ बॉक्स, इंपेरिअल व्हिस्कीचे १० बॉक्स, म्यकडोल रमचे ३ बॉक्स व बनावट देशी दारूचे ९ बॉक्स आढळून आले. या कारवाईत वाहनासह एकूण १० लाख १७ हजार ७८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुसरा आरोपी बाळासाहेब जायभाये हा फरार आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, नगरचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे निरीक्षक अण्णासाहेब बनकर, घोरतळे, दुय्यम निरीक्षक दिंडकर, अजित बडदे, महिपाल धोका, विजय सूर्यवंशी, दत्तात्रेय ठोकळ, वैभव बारवकर, जवान दिगंबर ठुबे, उत्तम काळे, अंकुश कांबळे, सचिन वामने, सचिन बटोळे, सांगळे, रत्नमाला काळापहाड, शुभांगी आठरे, संपत बिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास बनकर हे करत आहेत.
फोटो ३१ दारु
ओळी- राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे घरात साठवून ठेवलेला पाच लाख रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला.