गोदावरीतून वाळूची वाहतूक करणारा ट्रक्टर-ट्रॉलीसह जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 18:27 IST2020-04-15T18:26:40+5:302020-04-15T18:27:08+5:30
तालुक्यातील जेऊर कुंभारी हद्दीतील गोदावरी नदीच्या पात्रातून ट्रक्टर-ट्रॉली च्यासाह्याने वाळूची चोरटी वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांवर बुधवारी (दि.१५ एप्रिल ) रात्री दोन वाजेच्या सुमारास कारवाई केली.

गोदावरीतून वाळूची वाहतूक करणारा ट्रक्टर-ट्रॉलीसह जप्त
कोपरगाव : तालुक्यातील जेऊर कुंभारी हद्दीतील गोदावरी नदीच्या पात्रातून ट्रक्टर-ट्रॉली च्यासाह्याने वाळूची चोरटी वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांवर बुधवारी (दि.१५ एप्रिल ) रात्री दोन वाजेच्या सुमारास कारवाई केली.
या कारवाईत विना क्रमांकाचा ट्रक्टर व ट्रॉली असा ६ लाख २ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी नगर स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल सागर अशोक ससाणे यांनी सागर जगन आदमाने (वय 23 रा.स्वामी समर्थ मंदीराजवळ कोपरगाव ), निलेश उर्फ बापु काकडे (रा.मोहनीराजनगर, कोपरगाव ) यांच्याविरुद्ध पहाटे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सागर जगन आदमाने यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे करीत आहेत.