विजय औटी, ठुबे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

By Admin | Updated: July 6, 2014 00:18 IST2014-07-05T23:11:23+5:302014-07-06T00:18:27+5:30

पारनेर : शिवसेनेने विद्यमान आमदार विजय औटी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांची उमेदवारी जाहीर केली.

Seeking the candidature of Vijay Oti, Thube | विजय औटी, ठुबे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

विजय औटी, ठुबे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

पारनेर : शिवसेनेने विद्यमान आमदार विजय औटी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांची उमेदवारी जाहीर केली. ठुबे यांच्या उमेदवारीने उत्सुकता वाढली आहे़ तर राष्ट्रवादी, काँगे्रस व मनसेमध्ये सध्या शांतता आहे.
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विजय औटी हे सध्या प्रतिनिधीत्व करीत आहेत़ मागील निवडणुकीत राष्ट्रवादीतील असंतुष्ट तसेच काँग्रेसच्या सहकार्याने व सर्वपक्षीयांची साथ लाभल्याने औटी विजयी झाले. आता पुन्हा शिवसेनेने औटी यांनाच उमेदवारी दिली असून मुंबईच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले़ शिवाय औटी यांना संगमनेर व अकोले या दोन विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व देण्यात आले आहे़ त्यामुळे संगमनेर व अकोले येथील उमेदवार ठरविणे व कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गावनिहाय शिवसेना शाखा सुरु करण्याचा धडाका लावला असून, प्रचाराचे नियोजन सुरु केले आहे़ दुसरीकडे त्यांच्यापासून दूर गेलेले जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाबासाहेब तांबे यांना आता मनसेचा मार्ग निवडावा लागणार आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे औटींचा शिलेदारच त्यांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहे. ठुबे यांच्या उमेदवारीचे कान्हूरपठार गटात स्वागत होत आहे.
दोन्ही उमेदवार निश्चित झाले असताना काँगे्रस, राष्ट्रवादीत अद्यापही शांतता आहे. पारनेर मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे़ त्यामुळे हा मतदारसंघ काँगेसकडे घेण्याबाबत खल सुरु आहे़ तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील गटबाजी मिटण्याची चिन्हे नाहीत़ राष्ट्रवादीत इच्छुकांची मोठी यादी आहे़ त्यामुळे उमेदवारी जाहीर करताना आणि केल्यानंतर मोठा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Seeking the candidature of Vijay Oti, Thube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.