येवती येथे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:47+5:302021-06-09T04:26:47+5:30
कृषी अधिकाऱ्यांनी शेतावर येऊन भेट देऊन येवती येथील उत्तम दिवटे व जालिंदर दिवटे यांच्या आंबा व पेरु फळबागेची पाहणी ...

येवती येथे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक
कृषी अधिकाऱ्यांनी शेतावर येऊन भेट देऊन येवती येथील उत्तम दिवटे व जालिंदर दिवटे यांच्या आंबा व पेरु फळबागेची पाहणी केली. पिंप्री कोलंदर तसेच देवदैठण येथील शेतकऱ्यांनाही बियाण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर संजय ओहोळ व बाजीराव ठोंबरे यांच्या शेतात तुरीवर रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करण्याबाबत प्रात्यक्षिक करुन दाखवले. यावेळी संतोष दिवटे यांनीही सहभाग नोंदविला. .........
चौकट श्री प्रवीण गवांदे
उपविभागीय कृषी अधिकारी, कर्जत
:
खरीप हंगाम पेरणी पूर्व बीज प्रकिया तूर, मूग, उडीद, मका यांचे बियाणे करताना रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया केल्याने उत्पादन खर्चात बचत होते. पिकाची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. पेरणी पूर्व बियाण्यास बीजप्रक्रिया करणे ही अतिशय फायदेशीर बाब आहे. शेतकऱ्यांनी ती अंगीकारली पाहिजे. आम्ही त्यासाठी मोहीम राबवत आहोत.
-प्रवीण गवांदे, उपविभागीय कृषी अधिकारी
...........
०८ येवती
येवती येथे तुरीवर रासायनिक व जैविक बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविताना तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, कृषी मंडल अधिकारी आबासाहेब भोरे, कृषी सहाय्यक प्रतीक कांबळे आदी. (छायाचित्र : पंकज गणवीर)