दुसरी लाट ओसरतेय, कोरोनाबाधितांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:22+5:302021-06-09T04:25:22+5:30
सोमवारी ८८३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ...

दुसरी लाट ओसरतेय, कोरोनाबाधितांची संख्या घटली
सोमवारी ८८३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ९५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत ५३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार ५८ इतकी झाली आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने जिल्हा निर्बंध स्तर-१ मध्येच राहिला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८९ आणि अँटिजेन चाचणीत १८६ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (३४), राहाता (१८), संगमनेर (६८), श्रीरामपूर (३३), नेवासा (४९), नगर ग्रामीण (१५), पाथर्डी (३७), अकोले (१३), कोपरगाव (५), कर्जत (३४), पारनेर (५८), राहुरी (१८), भिंगार (१), शेवगाव (६६),जामखेड (४१), श्रीगोदा (३६), इतर जिल्हा (४),इतर राज्य (०). मिलिटरी हॉस्पिटल (०).
दरम्यान गत २४ तासात जिल्ह्यात ३० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे.
-------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या : २,५८,९५८
उपचार सुरू असलेले रुग्ण : ६०५८
मृत्यू : ३५१३
एकूण रुग्ण संख्या : २,६८,५२९