राहुरीत दुसरा बळी

By Admin | Updated: June 5, 2014 00:09 IST2014-06-04T23:24:17+5:302014-06-05T00:09:04+5:30

राहुरी : वादळी पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून ६६ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी राहुरी तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने अनेक घरांची पडझड झाली.

Second victim of survival | राहुरीत दुसरा बळी

राहुरीत दुसरा बळी

राहुरी : वादळी पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून ६६ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी राहुरी तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने अनेक घरांची पडझड झाली. वादळी पावसामुळे गेलेला हा दुसरा बळी आहे. मंगळवारी राहुरीसह परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले, तसेच घरांच्या भिंती कोसळल्या. वांबोरी येथील राजेश खकाळ हा बारा वर्षीय मुलगा पत्र्याने कापल्यामुळे जखमी होऊन ठार झाला. तर तुळापूर येथे घर अंगावर पडून झालेल्या अपघातात ठकूबाई विठोबा हारदे (वय ६६) या वृध्देचे निधन झाले़ निंभेरे येथे वादळामुळे तीन शेळ्या मृत्युमुखी पडल्या़ उंबरे येथे भाऊसाहेब चौधरी यांच्या मालकीचा बैल वादळामुळे मरण पावला़ वांबोरी, सडे,उंबरे, ब्राम्हणी, तुळापूर, म्हैसगाव येथे वादळी पावसामुळे घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली़ यासंदर्भात राहुरीचे तहसीलदार राजश्री आहिरराव यांनी कामगार तलाठ्यांना पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे़ सकाळी पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे़ घरांच्या पडझडीमुळे अनेकजण बेघर झाले आहेत़ येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होण्याची शक्यता आहे़ आधीच्या गारपिटीचे पंचनामे झाल्यानंतर अद्याप सर्व शेतकर्‍यांना मदत मिळालेली नाही़ वादळामुळे पाच गावांच्या परिसरात शेकडो झाडे जमीनदोस्त झाली़ फळांची नासाडी झाली़ उसाचे पीकही वादळाच्या क चाट्यातून सुटले नाही़ मात्र पंचनामे केवळ घरांच्या पडझडीचे सुरू होते़ पिकांचेही पंचनामे करण्यात यावेत, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे़

Web Title: Second victim of survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.