कोव्हॅक्सिनचा आज दुसरा डोस मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST2021-06-09T04:27:00+5:302021-06-09T04:27:00+5:30
.... सावेडी भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव अहमदनगर : महापालिकेच्या वतीने सावेडी भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून, ...

कोव्हॅक्सिनचा आज दुसरा डोस मिळणार
....
सावेडी भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव
अहमदनगर : महापालिकेच्या वतीने सावेडी भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून, त्यासाठी सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रस्ताव तयार करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले.
....
शहर व परिसरात संततधार
अहमदनगर : शहरासह उपनगरांत मंगळवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक व दुकानदारांची चांगलीच धावपळ उडाली. दुपारनंतरही पावसाची संततधार सुरूच होती. रविवारी रात्रीही शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला.
...
सावेडी व्यापाऱ्यांची बैठक
अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने शहरासह उपनगरातील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे; परंतु व्यापाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून व्यावसाय करावा, याबाबत सावेडी उपनगरातील व्यापाऱ्यांची बैठक रविवारी पार पली. या बैठकीत अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
..
केडगाव येथे पाहणी
अहमदनगर : केडगाव येथील शिक्षक वसाहतीतील पाणी प्रश्नाच्या नागरिकांनी केलेल्या तक्रारीबाबत माहिती घेण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी परिसराची पाहणी केली. तसेच या भागातील पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचे अश्वासन नागरिकांना दिले.
...
भवानीनगर येथील रस्त्याचे काम सुरू
अहमदनगर : सारसनगर येथील भवानीनगर भागातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, गणेश भोसले आदी उपस्थित होते.
....