संगमनेर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 15:38 IST2017-01-02T15:38:20+5:302017-01-02T15:38:20+5:30
बोटा परिसरा २.६ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले आहेत.यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

संगमनेर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के
>ऑनलाइन लोकमत
संगमनेर/बोटा, दि.2 - संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरात रविवारी मध्यरात्री २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नाशिक येथील भूकंपमापन यंत्रावर याची नोंद झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसराट घबराट पसरली आहे. गेल्या तीन महिन्यांत या भागात कमी-अधिक प्रमाणात जमिनीतून आवाज येण्याच्याही घटना घडल्या आहेत. मध्यंतरी भूवैज्ञानिकांनी या भागाची पाहणी केली होती.
रविवारी (दि. १) हे धक्के पुन्हा जाणवले. बोटा, माळवाडी, तेळेवाडी, कुरकुटवाडी, आंबेदुमाला या परिसरात रविवारी दिवसा काही ठिकाणी पूर्वीप्रमाणेच जमिनीतून आवाज आल्याचे ग्रामस्थांना जाणवले. परंतु रात्री बाराच्या सुमारास याची तीव्रता अधिक होती. ११.५४ वाजता २.३, तर ११.५६ वाजता २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिक येथील भूकंपमापन यंत्रात या धक्क्यांची नोंद झाली आहे.
दरम्यान, संगमनेरचे नायब तहसीलदार अशोक रंधे, मंडलाधिकारी कडलग यांच्यासह महसूल विभागाच्या पथकाने या भागाची पाहणी केली. या घटनेने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. यापूर्वी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातही जमिनीतून आवाज येण्याचा प्रकार येथे घडला आहे. त्यावेळी नाशिक येथील भूवैज्ञानिक चारूलता चौधरी यांनी या भागात पाहणी केली होती.