विखेंचा शिक्का भोवला !
By Admin | Updated: March 18, 2024 16:46 IST2014-05-18T00:07:00+5:302024-03-18T16:46:08+5:30
शिवसेनेचे आमदार अशोक काळे यांनी पक्षासाठी आणि त्याहून अधिक लोखंडेंसाठी केलेली धावपळ, वाकचौरे यांच्यावर लागलेल्या विखेंच्या लेबलमुळे व्यक्तीकेंद्रीत उमेदवार असा झालेला अपप्रचार

विखेंचा शिक्का भोवला !
शिवसेनेचे आमदार अशोक काळे यांनी पक्षासाठी आणि त्याहून अधिक लोखंडेंसाठी केलेली धावपळ, वाकचौरे यांच्यावर लागलेल्या विखेंच्या लेबलमुळे व्यक्तीकेंद्रीत उमेदवार असा झालेला अपप्रचार अन् देशभराप्रमाणे येथेही असलेला मोदी लाट सदाशिव लोखंडेंना तारून गेली. निवडणुकीच्या तोंडावर वाकचौरे सेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसच्या वळचणीला गेले़ याचा वचपा शिवसैनिकांनी काढला. प्रथम सेनेने आ़ बबनराव घोलप यांना उमेदवारी दिली़ मात्र न्यायालयाच्या निकालामुळे घोलप अडचणीत सापडले़ त्यानंतर लोकसभा मतदारसंघात एकमेव शिवसेनेचे आमदार असलेल्या अशोक काळेंवर उमेदवार शोधण्यापासून त्यास निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने टाकली़ तेव्हा आ़ काळे यांनी लोखंडे यांना उमेदवारी मिळवून दिली व त्यांच्या विजयाचे शिवधनुष्य पेलले़ कोपरगावात महायुतीच्या एकाही बड्या नेत्याची सभा झाली नाही़ उलट आघाडीचे तीन मंत्री येथे येऊन प्रचार करून गेले़ मागील लोकसभा निवडणुकीत वाकचौरे यांना कोपरगावमधून २६ हजाराचे मताधिक्य मिळाले होते़ परंतु यंदा सासुरवाडीच जावयावर रूसली़ ५५ हजार मतांचे दान जावयांच्या प्रतिस्पर्ध्याला देऊन त्यांनी ते दाखवूनही दिले.