प्रस्तावांची छाननी सुरू, आंदोलन न करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:20 IST2021-03-07T04:20:12+5:302021-03-07T04:20:12+5:30

तिसगाव : शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेंतर्गतच्या गाय गोठा, शेळी पालन, कुक्कुटपालन लाभांच्या प्रस्तावांची छाननी सुरू आहे. ग्रामपंचायत स्तरांवर प्रत्यक्षात ...

Scrutiny of proposals started, appeal not to agitate | प्रस्तावांची छाननी सुरू, आंदोलन न करण्याचे आवाहन

प्रस्तावांची छाननी सुरू, आंदोलन न करण्याचे आवाहन

तिसगाव : शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेंतर्गतच्या गाय गोठा, शेळी पालन, कुक्कुटपालन लाभांच्या प्रस्तावांची छाननी सुरू आहे. ग्रामपंचायत स्तरांवर प्रत्यक्षात काम करताना कुशल-अकुशल कामाचे साठ चाळीसचे प्रमाण संतुलित राखण्यासाठीचे प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय नियोजन सुरू आहे. नियोजित बैठा सत्याग्रह आंदोलन करू नये, अशा आशयाचे लेखी पत्र गटविकास अधिकारी शीतल शिंदे यांनी शिवसेना महिला संघटक सविता ससे यांना दिले आहे. प्रस्ताव रखडल्याबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे पंचायत समितीची प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. हा प्रस्ताव नामंजूर करतानाच्या काही अटी व कार्यारंभ आदेशाबाबतचा खुलासा दिलेल्या लेखी आश्वासनात नसल्याचे सविता ससे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. बुधवारी (दि.१०) नियोजित बैठे सत्याग्रह आंदोलन होणारच आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Scrutiny of proposals started, appeal not to agitate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.