कचऱ्याच्या विळख्यात भरला भिंगारचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:20 IST2021-04-10T04:20:57+5:302021-04-10T04:20:57+5:30

भिंगार : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद असूनही भिंगार येथे कचऱ्याच्या विळख्यातच शुक्रवारी भाजीबाजार भरला होता. येथे ग्राहक ...

The scrap market is full of rubbish | कचऱ्याच्या विळख्यात भरला भिंगारचा बाजार

कचऱ्याच्या विळख्यात भरला भिंगारचा बाजार

भिंगार : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद असूनही भिंगार येथे कचऱ्याच्या विळख्यातच शुक्रवारी भाजीबाजार भरला होता. येथे ग्राहक विक्रेत्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोरोनाबाबतचे नियमही धाब्यावर बसविण्याचा प्रकार येथे दिसून आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र येथील नागरिक सर्रास नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. बंदी असूनही शुक्रवारी भिंगारचा बाजार भरला. गर्दीमुळे येथील रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली हाेती. याकडे वडारवाडी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. भिंगार येथे गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. येथे अनेक जण विनामास्क फिरतानाही आढळतात. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च दक्षता घेणे गरजेचे आहे.

Web Title: The scrap market is full of rubbish