मुळानगर फाट्याजवळ पलटी झालेल्या स्कॉर्पियोने घेतला पेट; पाचजण बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 14:16 IST2017-12-06T14:15:07+5:302017-12-06T14:16:09+5:30
मुळानगर फाट्यावरून जाणा-या स्कॉर्पियोने अचानक पलटी घेतली. या गाडीने काळी वेळातच पेट घेतला. बुधवारी सकाळी ही घटना घडली.

मुळानगर फाट्याजवळ पलटी झालेल्या स्कॉर्पियोने घेतला पेट; पाचजण बचावले
राहुरी : मुळानगर फाट्यावरून जाणा-या स्कॉर्पियोने अचानक पलटी घेतली. या गाडीने काळी वेळातच पेट घेतला. बुधवारी सकाळी ही घटना घडली.
एम़ एच़ १६, बी़ यु़ ९६ ही स्कॉर्पियो गाडी मुळानगर फाटा रस्त्याने जात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. गाडी पलटी झाल्यानंतर स्कार्पियोमधील पाचजणांनी कशीबशी सुटका करुन घेत जीव वाचविला. त्यानंतर काही सेकंदातच गाडीने पेट घेतला. तेथे गाडी विझविण्यासाठी पाणी किंवा इतर काहीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे ही गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. ही गाडी सोनम निकम यांच्या मालकीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख हे करीत आहेत.