सिद्धार्थनगरची शाळा होणार मॉडेल स्कूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:37 IST2020-12-12T04:37:03+5:302020-12-12T04:37:03+5:30
श्रीगोंदा : माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नगरपालिका टीमने शुक्रवारी बाजारतळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसराची साफसफाई व ...

सिद्धार्थनगरची शाळा होणार मॉडेल स्कूल
श्रीगोंदा : माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नगरपालिका टीमने शुक्रवारी बाजारतळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसराची साफसफाई व वृक्षारोपण केले. पालिकेच्या माध्यमातून सिद्धार्थनगरची प्राथमिक शाळा माॅडेल स्कूल करणार आहोत, अशी माहिती नगराध्यक्षा शुभांगी पोटे व उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे यांनी दिली.
सिद्धार्थनगर प्राथमिक शाळेत दलित वस्तीमधील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेचा दर्जा चांगला आहे. मात्र इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे २५ लाख रूपये खर्च करून ही शाळा माॅडेल स्कूल बनविण्यात येणार आहे. पालिका सभागृहात हा विषय मांडू, असे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितले.
यावेळी सीमा गोरे, शहाजी खेतमाळीस, संतोष खेतमाळीस, दत्ताजी जगताप, सतीश मखरे, ह्रदय घोडके, निसार बेपारी, नारायण घोडके, अरविंद कापसे, प्रशांत गोरे, संतोष क्षीरसागर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप मोटे यांनी केले.
फोटो : ११ श्रीगोंदा१
श्रीगोंदा येथील सिद्धार्थनगर येथील शाळा.