शाळा ऑनलाइन तर विद्यार्थी ऑफलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:32+5:302021-06-20T04:15:32+5:30

कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील पहिली ते पाचवी जिल्हा परिषदेच्या शाळेत बघण्यास मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत एकूण पहिली ते ...

School online while students offline | शाळा ऑनलाइन तर विद्यार्थी ऑफलाइन

शाळा ऑनलाइन तर विद्यार्थी ऑफलाइन

कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील पहिली ते पाचवी जिल्हा परिषदेच्या शाळेत बघण्यास मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत एकूण पहिली ते पाचवी विद्यार्थी ३५ आहेत. या शाळेत शिकणारी मुले गरीब घरातील असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्राॅईड मोबाइल असतातच असे नाही. जरी असला तर त्यात ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी नेट पॅक असतोच असे नाही. काहींची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे सगळेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही. शंभर टक्क्यांपैकी ५० ते ६० विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतात. बाकी विद्यार्थ्यांच काय? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे.

..............

प्रतिक्रिया

सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याची प्रणाली निर्माण झाली. ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अँड्रॉईड मोबाइलची गरज असते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे असेलच असे नाही. मग आम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांना घरी जाऊन ऑफलाइन अभ्यास द्यावा लागतो.

- संभाजी लांघे, मुख्याध्यापक, शिरसगाव

...............

विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाइन अभ्यास चालू आहे. पण ग्रामीण भागात काही पालकांकडे अँड्रॉईड मोबाइल नसल्याने अडचण येत आहे. कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभ्यास सांगितला जातो. वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवल्या जातात.

- पोपट काळे, शिक्षण अधिकारी, कोपरगाव

Web Title: School online while students offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.