शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

शालेय पोषण आहार, बांधकाम विभागात अनागोंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 11:10 IST

विहिरी मंजुरीमध्ये रोहयो विस्तार अधिकाऱ्यांवर ठपका, शालेय पोषण आहारातील गैरप्रकाराकडे शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष, बांधकाम विभागात अनागोंदी, असे प्रकार उघड करीत पंचायत राज समितीने गटविकास अधिका-यांसह सर्वच अधिका-यांची चांगलीच कानउघाडणी केली.

पारनेर : विहिरी मंजुरीमध्ये रोहयो विस्तार अधिकाऱ्यांवर ठपका, शालेय पोषण आहारातील गैरप्रकाराकडे शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष, बांधकाम विभागात अनागोंदी, असे प्रकार उघड करीत पंचायत राज समितीने गटविकास अधिका-यांसह सर्वच अधिका-यांची चांगलीच कानउघाडणी केली. सर्वांकडून खुलासे मागवण्याचे आदेश दिले.  रोहयो विस्तार अधिका-यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली.गटप्रमुख आमदार विरेंद्र जगताप व आमदार चरण सोनवणे, रणधीर सावरकर, राहुल मोटे या चौघांच्या समितीचे दुपारी पारनेर विश्रामगृहावर स्वागत झाले. पंचायत समिती सभापती राहुल झावरे, उपसभापती दीपक पवार, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, डॉ़ नरेंद्र मुळे उपस्थित होते. तेथेच पंचायत समिती सदस्य डॉ़ श्रीकांत पठारे यांनी दलित वस्तीचा निधी मागे जातो, विहिरींची कागदपत्रे पूर्ण होऊनही मंजुरी मिळत नाही, अशा तक्रारी केल्यावर आमदार वाघमारे, जगताप यांनी गटविकास अधिकारी तनपुरे व रोहयो विस्तार अधिकारी महादेव भोसले यांना धारेवर धरले़ भोसले यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश समितीने दिले.‘कान्हूरपठार’ प्रकरणी कारवाई का नाही?कान्हूरपठार ग्रामपंचायतमध्ये गैरप्रकार झाल्याचे निवेदन सखाराम ठुबे यांनी दिले होते़ यावरून समितीने गटविकास अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले़ या प्रकरणी ग्रामसेवक व सरपंचांवर कारवाई का केली नाही? त्यातील दोषींना पाठीशी का घातले? असे प्रश्न करून याबाबत खुलासा करावा, असे आदेश समितीने दिले.आश्रमशाळेची झाडाझडतीविद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येणारा धान्यसाठा दोन वर्षापूर्वीचा आणि विद्यार्थ्यांच्या निवासी आश्रमशाळांच्या नोंदीत तफावत असल्याचे ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेची अनागोंदी पंचायत राज समितीच्या झाडाझडतीत उघड झाली. आश्रमशाळेतील धान्य गोदामाची समितीने तपासणी केली. गहू हा दोन वर्षांपूर्वीचा असल्याची बाब समितीच्या निदर्शनास आली़ समितीने याची दखल घेत नवे धान्य विकायचे व जुने धान्य विद्यार्थ्यांना द्यायचे, असे उद्योग चालतात का? असा सवाल केल्यावर अधीक्षक निरुत्तर झाले़ यामधील गव्हाच्या पोत्यांवर २०१६-१७ असे लिहिले होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर