अहमदनगरमधील निंबोडी येथील शाळेची इमारत कोसळली, १६ विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 18:06 IST2017-08-28T17:32:08+5:302017-08-28T18:06:07+5:30
नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली असून, या शाळेत ३५ विद्यार्थी अडकले आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. या दुर्घटनेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

अहमदनगरमधील निंबोडी येथील शाळेची इमारत कोसळली, १६ विद्यार्थी जखमी
अहमदनगर, दि. 28 - नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली असून, या शाळेत ३५ विद्यार्थी अडकले आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. या दुर्घटनेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
नगर तालुक्यातील निंबोडी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेची इमारती जुनी झाली होती. सलग दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे या शाळेची इमारती कोसळली. त्यामुळे सुमारे ३५ विद्यार्थी शाळेत अडकले असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून सांगण्यात आली. काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. शाळा पडल्याची माहिती जिल्हा परिषदेत समजताच जिल्हा परिषदेत एकच धावपळ उडाली. जिल्हा परिषदेने तातडीने एक रुग्णवाहिका निंबोडीला रवाना केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, शिक्षणाधिकारी काटमोरे, आरोग्य अधिकारी नागरगोजे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, जखमी मुलांवर तेथेच प्राथमिक उपचार केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.