पाचेगावात शालेय सकस आहार सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:44+5:302021-09-13T04:20:44+5:30
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील अंगणवाडीमध्ये शालेय सकस आहार सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नेवासा एकात्मिक बाल ...

पाचेगावात शालेय सकस आहार सप्ताह
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील अंगणवाडीमध्ये शालेय सकस आहार सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नेवासा एकात्मिक बाल विकास सेवा विभागाच्या वतीने सही पोषण, देश रोशन कार्यक्रमांतर्गत शालेय सकस आहार सप्ताहाचे आयोजन सध्या सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत गावातील सर्व सात अंगणवाड्यांतील सर्व सेविका, मदतनीस यांनी शालेय सकस आहार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सकस आहार कार्यक्रमात सत्वयुक्त फळे, घरगुती भाजीपाला, कडधान्य, अंडी आदींची मांडणी करण्यात आली होती. सर्व सेविका आणि मदतनीस यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षक श्रीमती साळवे, सेविका मीना धाकतोडे, प्रतिभा राजगुरू, प्रमिला आवटे, प्रयागा माळी, निर्मला राऊत, मनीषा तुवर, मदतनीस शोभा पडोळ, अनिता बर्डे, चंदा क्षीरसागर, मुक्ताबाई क्षीरसागर, सुलोचना तुवर, उर्मिला गाढे आदी उपस्थित होत्या.
120921\img_20210908_115212.jpg~120921\img_20210908_114631.jpg~120921\img_20210908_114919.jpg
पाचेगावात शालेय पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अंगणवाडी सेविका.~पाचेगाव~पाचेगाव