राहाता तालुक्यात स्कूलबस उलटली, पाच विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 12:55 IST2018-06-30T12:54:59+5:302018-06-30T12:55:18+5:30
राहाता तालुक्यातील वाकडीजवळ स्कूलबस उलटल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये पाच विद्यार्थी आणि एक शिक्षिका जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राहाता तालुक्यात स्कूलबस उलटली, पाच विद्यार्थी जखमी
अहमदनगर : राहाता तालुक्यातील वाकडीजवळ स्कूलबस उलटल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये पाच विद्यार्थी आणि एक शिक्षिका जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील विवेकानंद इंग्लिश स्कूलची बस नेहमीप्रमाणे ५० विद्यार्थ्यांना घेऊन मार्गक्रमण करत होती. ही बस वाकडीजवळून जात असताना पाठा तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळं बस रस्त्याच्या शेजारी उलटली. वीजेच्या खांबावर बस आदळल्याने तारा तुटल्या. या तारा तुटल्याने वीजप्रवाह खंडीत झाला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.