पालिका शाळेतील पटसंख्या घटली
By Admin | Updated: July 7, 2014 00:34 IST2014-07-06T23:32:13+5:302014-07-07T00:34:21+5:30
अहमदनगर: महापालिकेच्या शाळेतील पटसंख्या कमालीची घटली असून, कामात सुधारणा करण्याच्या सूचना रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत़
पालिका शाळेतील पटसंख्या घटली
अहमदनगर: महापालिकेच्या शाळेतील पटसंख्या कमालीची घटली असून, कामात सुधारणा करण्याच्या सूचना रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत़ खासगी शाळांना भाडेतत्वावर दिलेल्या इमारती ताब्यात घेण्याचे यावेळी ठरले़
महापालिकेच्या सर्वधारण सभेतील चर्चे दरम्यान ही बाब उघडकीस आली़ शिक्षण मंडळाच्या जमा-खर्चाचा तपशील अंदाजपत्रकात देण्यात आला नाही़ याविषयी सदस्य दीप चव्हाण यांनी सभागृहाचे लक्ष वेधले असता शिक्षण मंडळाकडून पटसंख्या, शिक्षक आणि खर्चाची माहिती देण्यात आली़ त्यात महापालिकेच्या शहरात १२ शाळा आहेत़ या शाळेत नवीन २६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे़ शिक्षकांनी शहरात फिरून मोहीम राबविली़
मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही़ पालिकेच्या शाळेत एकूण १ हजार १८० विद्यार्थी असून, शिक्षकांची संख्या ६७ आहे़ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत़ त्यांना इतरत्र पाठविण्यात आले आहे़ पटसंख्या घटल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त करत ही स्थिती कायम राहिली तर शाळा बंद करण्याची वेळ येईलक़ामात सुधारणा करा,अशी मागणी केली़ (प्रतिनिधी)
शिक्षण विभाग आयुक्तांच्या नियंत्रणात
शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले आहे़ शिक्षण मंडळाचे सभापती सतीश धाडगे यांना नुकतेच कार्यमुक्त करण्यात आले आहे़ त्यामुळे शिक्षण मंडळाच्या इतर खर्चाला कात्री लावणे शक्य झाले असून, यापुढे शिक्षण मंडळ आयुक्तांच्या नियंत्रणात असेल़ न्यायालयाच्या या निर्णयामुळे शाळेत सुधारणा करण्यात येतील़
पालिकेची १७ नंबर शाळा
सभागृहातील बहुतांश सदस्य पालिकेच्याच शाळेत शिकले आहेत़ पालिकेच्या शाळा कायम ठेवायच्या असतील तर विशेष प्रयत्नाची गरज असल्याचे सदस्यांनी सांगितले़ याविषयी कुमार वाकळे यांनी मी पालिकेच्या १७ नंबर शाळेत शिकलो़ म्हणून आज इथे आहे,असे सांगून शिक्षक मावा खाऊन शाळेत येत असतील तर विद्यार्थी कसे मिळतील़ शिक्षकांना शिस्त लावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली़